PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींना मारण्याचा कट रचल्याची अफवा पसरवणारा गजाआड

एमपीसी न्यूज – पोलिसांच्या आपत्कालीन क्रमांक 112 वर फोन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना मारण्याचा कट रचल्याची खोटी माहिती देणाऱ्याला देहुरोड पोलिसांनी (Dehuroad police) बेड्या ठोकल्या आहेत.

मनोज अशोक हंसे (रा.देहुरोड) असे अटक आरोपीचे नाव असून त्याने मंगळवारी (दि.4) सकाळी साडे सात वाजता हा फोन केला होता.

money Fraud: सहा महिन्यात दाम दुप्पट देतो असे आमिष दाखवून 25 लाखांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या 112 या क्रमांवर फोन करून मुंबई रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवला असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याचा कट आहे अशी खोटी बातमी दिली. पोलिसांनी तपासणी केली असता ही अफवा असल्याचे समोर आले. पोलिसांनी तांत्रिक तपासा द्वारे आरोपीला शोधले. त्याला फोन का केला म्हणून पोलिसांनी चौकशी केली असता पोलिसांशीच आरोरावी करत धक्काबुक्की केली. यावरून आरोपीवर गुन्हा दाखल केला असून देहुरोड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याचा पोलीस पुढिल तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.