BNR-HDR-TOP-Mobile

Pune : फेक कॉलरकडून इसमाची ऑनलाईन माध्यमाद्वारे दोन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – फेक कॉलरकडून कंपनीत गुंतवणूक करण्यास लावून चांगल्या परताव्याच्या आमिषाने एका इसमाची दोन लाखांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी खडकी येथील एका 32 वर्षीय इसमाने फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना एका अज्ञात मोबाईलधारक महिलेने फोन करून त्यांच्या नोयडा येथील डेटिंग क्लब डॉट कॉम या कंपनीत पैसे गुंतवणूक करण्यास सांगितले. या कंपनीत पैसे गुंतविल्यास दर महिन्याला 25 ते 30 हजार रुपयांपर्यंतचा फायदा होईन असे सांगितले. या चांगल्या परताव्याच्या आमिषाने फिर्यादी यांनी वेळोवेळी कंपनीच्या इसमाच्या नावे असलेल्या बँक खात्यावर दोन लाख 9 हजार रुपये भरले.

मात्र, फिर्यादी यांना कोणताही परतावा मिळाला नाही. त्यानंतर त्याना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी खडकी पोलीस ठाण्यात याविषयी फिर्याद दिली असता अज्ञात महिलेवर माहिती व तंत्रज्ञान कायद्यान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  खडकी पोलीस पुढील तपास करीत आहे.

HB_POST_END_FTR-A2