Pune : ट्रकची मोटारसायकलला धडक; एकाचा मृत्यू

एक जण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – कात्रज कोंढवा रोडवर एका ट्रकने मोटारसायकलला जबर धडक दिली. यामध्ये मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाला असून पाठीमागे बसलेल्या इसमाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 16) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.

याप्रकरणी शाकीर पानसरे (वय 29, रा. येवलेवाडी) यांनी फिर्याद दिली.राम अंगध माने (वय 23, रा. वाघजाईनगर, कात्रज), असे मयत झालेल्या तरुणाचे नाव असून मोटारसायकल चालक बबन महादेव इंगळे (रा. वाघजाईनगर कात्रज), हा गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शाकीर हे कात्रज कोंढवा रोडवरील धर्मावत पेट्रोल पंपाकडे जात होते. यावेळी आदि चामुण्डा स्टोन मार्बल शेजारी जखमी इंगळे हे त्यांची मोटारसायकल घेऊन मयत राम यांच्या सोबत जात होते. यावेळी धर्मावत पेट्रोल पंपाकडून येणा-या एका ट्रकने त्याने त्यांच्या मोटारसायकलला जोरात धडक दिली. यामध्ये माने यांचा मृत्यू झाला तर इंगळे हे गंभीर जखमी झाला. कोंढवा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.