Pune : पीएमपी बसच्या धडकेत पादचा-याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएल बसने रस्त्याने पायी जाणा-या इसमाला धडक दिली. यामध्ये पादचा-याचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.27) सकाळी सात वाजून 20 मिनिटांनी कात्रज पीएमपी बस स्टॅण्ड येथे घडली.

राजेश चिन्नू ठाकूर (वय 47, रा. पर्वती दर्शन, कात्रज), असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय ठाकूर (वय 21 रा. पर्वती दर्शन, कात्रज) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी बस चालक हणिनीनाथ दशरथ ढगारे (वय 27, रा. न-हेगाव, कात्रज) याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय याचे वडील सोमवारी सकाळी पीएमटी बस स्टॅण्ड येथून पायी जात होते. यावेळी आरोपी ढगारे यांनी त्यांच्या ताब्यातील बस वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवून मयत राजेश यांना जोरदार धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने राजेश याचा मृत्यू झाला.

पीएमपी बस चालकावर मोव्हे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.