Pune : फेक टेलीकॉलरकडून इसमाची 40 हजारांना फसवणूक

एमपीसी न्यूज – एका ज्येष्ठ नागरिकाला फोन करून आधार कार्ड लिंक करण्याच्या बहाण्याने बँक खात्याचा तपशीलाची माहिती घेऊन त्यांच्या बँक खात्यातून 40 हजार रुपये परस्पर ट्रान्सफर करून फसवणूक केली.

या प्रकरणी एका 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने दिलेल्या फिर्यादीनुसार अनोळखी इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना दि 9 मे 2018 रोजी दुपारी एक वाजता फोन करून आधार कार्ड लिंक करण्याचे कारण देऊन त्यांना 19 अंकी नंबरचा मेसेज केला. तो मेसेज त्यांना एअरटेल कंपनीला 121 या नंबरवर पाठविण्यासाठी प्रवृत्त केले. त्यानंतर 11 मे 2018 रोजी आरोपीने फिर्यादींच्या अलाहबाद बँकेच्या चिंचवड शाखेतून युपीआयचा वापर करून 25 हजार आणि 16 हजार 500 रुपयांची अशी एकूण 41 हजार 500 रुपये ट्रान्सफर करून फसवणूक केली. पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.