Pune : जुन्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून एकाचे अपहरण

सहाजणांना अटक; पोलिसांच्या तात्काळ कारवाईने इसमाची सुटका

एमपीसी न्यूज – जुन्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून आठ जणांनी मिळून एका इसमाचे अपहरण केले. मात्र, नियंत्रण कक्षाला याची माहिती मिळताच पोलिसांनी शोध घेत इसमाची सुटका केली. तर सहा जणांना अटक केली. ही घटना गुरुवारी (दि. 16) बाणेर येथे घडली.

सुरज संदीप सनस (वय 20, रा. सुरवड, वेल्ला, पुणे), उत्तम राजाराम चोरगे (वय, 21 रा. वेल्ला, पुणे), रोहित पंढरीनाथ चोरगे (वय 19, रा. कात्रज) संताजी तानाजी भोसले (वय 21, विंजर), अक्षय तुकाराम धरपाळे (वय 19, रा. वांजळे), मुकेश राजाराम आसवले (वय, 22 रा. वडगाव शेरी), अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एका 40 वर्षीय पुरुषाने फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे आरोपींसोबत जुन्या आर्थिक व्यवहारातून वाद आहेत. यातून आरोपींनी फिर्यादी हे बाणेर येथील पॅनकार्ड रोडवर बेवर्ली हिल्स सोसायटी समोर फोनवर बोलत उभे असताना पांढ-या रंगाच्या कारमधून येऊन त्यांना जबरदस्तीने मारहाण करीत उचलून नेले.

ही घटना तिथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीने पाहिली आणि नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिली.माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कार्यवाही करीत फिर्यादी यांना दोन तासात शोधून काढून त्यांची सुटका केली. तसेच एकूण 6 जणांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.