Pimpri : कंट्रोलला फोन अन् अवघ्या काही तासात पोलिसांनी वाचवले आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे प्राण

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कंट्रोल रुमला ( Pimpri ) काल (शुक्रवारी) दुपारी एक फोन आला अन परिस्थितीचे गांभीर्य ओळखून निगडी पोलिसांनी त्वरित घटनास्थळी जाऊन आत्महत्या करु पाहणाऱ्या तरुणाचे प्राण वाचवले आहेत. हा सारा प्रकार निगडी येथील यमुनानगर परिसरात घडला आहे.

तरुण हा मुळचा कोकणातील चिपळूण तालूक्यातील खेड येथील रहिवासी आहे. तो सध्या पिंपरी-चिंचवड शहरात इंजिनीयरींगचे शिक्षण घेत असून निगडीतील यमुनानगर परिसरात भाड्याने खोली करून राहतो.

Alandi : आळंदी यात्रेनिमित्त महावितरणची यंत्रणा सज्ज, 24 तास वीजसेवा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुण सध्या शिक्षण घेत असून त्याचे एका तरुणी सोबत प्रेमसंबंध आहेत. मात्र मागील आठ दिवसांपासून संबंधीत तरुणी ही तरुणाशी बोलणे टाळत होती. या ताणावातून त्याने घरी त्यांचे लग्न लावून देण्याची मागणी केली. मात्र घरच्यांनी त्यांच्या लग्नाला नकार दिल्याने  त्याने घरच्यांना फोन वरून आत्महत्या करत असल्याची धमकी दिली.

त्याच्या या धमकीला घाबरून त्याच्या कुटुंबीयांनी त्वरीत पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कंट्रोल रुमच्या 112 या क्रमांकावर फोन करून मदत मागितली. घटनेचे गांभीर्य ओळखून निगडी पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली व त्यांनी मुलाला समजवून त्याचे घरच्यांशी व्हिडीओ कॉलद्वारे बोलणे करून दिले.

यावेळी मुलाचे वडील व त्याच्या बहिणीच्या नवऱ्याने त्याला समजावून सांगितल्या नंतर तो शांत झाला. निगडी पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मुलापासून कित्येक किलोमीटर दूर असणाऱ्या पालकांना देखील त्यांच्या मुलाचे प्राण वाचल्याची हमी ( Pimpri ) मिळाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.