Shivali : येवलेवाडी येथील मंदिरावर कोसळला विजेचा खांब

एमपीसी न्यूज – शिवली येथील येवलेवाडी गावातील कानिफनाथ मंदिरावर विजेचा खांब कोसळला. सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही. ही घटना रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. 

मावळ तालुक्यात शुक्रवारपासून संततधार पाऊस पडत आहे. तर रविवारी दुपारी पाऊस ओसरला होता. मात्र, सोमवारी सकाळपासूनच वादळी वा-यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दररोज मंदिरात ग्रामस्थ बसत असतात. मात्र आज मंदिरात कोणी नसल्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. रविवारी दुपारी आडीच्या सुमारास मंदिरावर विजेचा खांब कोसळला मंदिारच्या बाजूलाचं घरे आहेत. सुदैवाने घरांवर हा खांब कोसळला नाही हा खांब कोसळल्याने विद्दुत तारा काही घरांवरही पडल्या आहेत.

ग्रामस्थांनी महाविरणकडे वेळो वेळी तक्रारी करुन देखील या खांबाची दुरुस्ती करण्यात आली नाही. घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी घडली नाही. मात्र, घटनेत कोणाचा जीव गेला असता तर त्याला जबाबदार कोण ठरलं असतं, असा प्रश्न विचारत ग्रामस्थांनी महावितरणाच्या भोंगळ कारभाराविरुद्ध संताप व्यक्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.