Malshej Ghat : माळशेज घाटात निसर्गाच्या सानिध्यात रविवारी रंगणार काव्यमैफल

एमपीसी न्यूज – भोसरीतील नक्षत्राचं देणं काव्यमंचतर्फे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही निसर्गाची भ्रमंती करण्यासाठी,निसर्गाचा प्रत्यक्ष अनुभव कवी वर्गाला मिळण्यासाठी विविध सहलीचे आयोजन करण्यात येते.यावर्षी “नक्षञांची पाऊस काव्यमैफल-माळशेज घाट” चे आयोजन करण्यात आले आहे. यात 27 नक्षञ अर्थात 27 कवी कवयिञींनी सहभाग घेतला आहे. ही काव्यसहल रविवारी (दि.21) सकाळी साडेसात वाजता भोसरी येथुन निघणार आहे.

निसर्गाची विविध रंगरुपांना अनुभवण्यासाठी या वर्षाविहार सहलीचे आयोजन केले आहे. पाऊसाची विविध रुपे आणि निसर्गरम्य जुन्नर पर्यटन तालुक्यात फिरण्यासाठी घेऊन जात आहे. या सहलीत नारायणगाव येथिल परिवार हॉटेलचा सुप्रसिद्ध कढीवडा नाष्टा घेऊन ही नक्षञ शिवजन्मभूमी जुन्नर येथील शिवनेरी किल्याच्या पायथ्याशी पूर्णाकृती छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माजी स्वातंञ्यसैनिक रमेश खरमाळे यांच्या हस्ते पुष्षहारअर्पण करुन भटंकतीसाठी सरुवात होणार आहे.

शिवसृष्टी शिल्प दर्शन,प्राचीन शिवकालीन पंचलिंग मंदिर दर्शन,मासवडी सुग्रास भोजनाचा आस्वाद घेत.पुढे पिंपळगाव जोगा धरणातील बोटींगचा अनुभव घेऊन हि नक्षञ माळशेज घाटात जाणार आहे.तेथे पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद घेत,माळशेज स्कायवॉकवरुन निसर्गाच्या सौदर्याला आपल्या मनात भरुन,तेथिल मनसोक्त निसर्गात काव्यमैफल रंगविणार आहे.तसेच अष्टविनायक श्री विघ्नहर गणपतीचे ओझरला दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला आठवणीला साठवत निघणार आहे. अशी माहिती संस्थापक राष्टीय अध्यक्ष -नक्षञाचं देणं काव्यमंचचे प्रा.राजेंद्र द.सोनवणे यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.