Pune : विधानसभा निवडणूक निकालाच्या पूर्वसंध्येला रंगली राजकीय-सांस्कृतिक दिवाळी

एमपीसी न्यूज – विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्यानतंर विधानसभा निवडणूक निकालाच्या पूर्वसंध्येला पुण्यात वेगळेच चित्र पाहायला मिळाले. सांस्कृतिक शहर अशी पुण्याची ओळख कायम ठेवत अभिनेते प्रविण तरडे, चिञपट अभ्यासक विनोद सातव यांनी राजकीय – सांस्कृतिक दिवाळी उत्सवाचे आयोजन केले.

या उत्सवात शहरातील आठ विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप,मनसेचे उमेदवार सहभागी झाले होते. विशेषत: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, उपसभापती नीलम गोरे, शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार दत्ताञय बहिरट, भाजपाचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे,पर्वती विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अश्विनी कदम, रामदास फुटाणे, आणि अभिनेते उपस्थित होते.

यावेळी चंद्रकांत पाटलांनी एक कोळीगीत गायले. त्यांचे एक कलापथक होते आणि ते तीन तासांचा कार्यक्रम करायचे, असे त्यांनी यावेळी सांगितले. पाठोपाठ त्या कोळिगीताच्या दोन ओळी ही गाऊन दाखवल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.