BNR-HDR-TOP-Mobile

Bhosari : कुर्‍हाडीने घाव घालून गरोदर पत्नीचा खून

एमपीसी न्यूज – कुर्‍हाडीने मानेवर घाव घालून पतीने गरोदर पत्नीचा खून केला. हा प्रकार आज (रविवारी) फुगेवाडी येथे सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडला. तसेच पतीने देखील स्वतःचा गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केला.

पूजा प्रवीण घेवडे (वय 25) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. प्रवीण घेवडे (वय 30) असे जखमी पतीचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रवीण हा मनोरुग्ण आहे. त्याने मागील आठ दिवसांपूर्वी त्याच्या आईचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर प्रवीणला पुण्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथून तो पळून आला. प्रवीण आणि पूजा यांना दोन मुले आहेत. पूजा आठ महिन्यांची गरोदर आहे. आज दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास प्रवीणने पूजाच्या मानेवर कुर्‍हाडीने घाव घातले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पूजाचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर प्रवीणने स्वतःचा गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

.