Alandi : संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या चांदीच्या रथाला जुंपण्यात येणाऱ्या मानाच्या बैलांची मिरवणूक

एमपीसी न्यूज – संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पालखी रथास  बैलजोडी जुपण्याचा मान तुळशीराम भोसले व रोहित भोसले यांना मिळाला आहे.
या निमित्ताने त्या बैलजोडीची भव्य मिरवणूक भोसले यांच्या वडगांव रस्त्या जवळील घरापासून वाजत गाजत ,फटाक्यांच्या अतिषबाजीत निघाली. त्यापुर्वी त्या कुटुंबातील माता भगिनींनी या मानाच्या बैलजोडीचे पूजन केले. त्यानंतर मिरवणुकीला सुरवात झाली. ठिकठिकाणी या मानाच्या बैलांचे पूजन करण्यात आले.  मानकरी भोसले यांचा शहरातील विविध ठिकाणी हार शाल नारळ देत सन्मान करण्यात आला.भैरवनाथ मंदिर, माऊलीं मंदिर तसेच श्री नृसिंह मठ येथे या मानाच्या बैलांचे वेद मंत्र्याच्या उच्चारात विधिवत पूजन करण्यात आले.
यावेळी विश्वस्त विकास ढगे पाटील, सोहळा मालक राजाभाऊ पवार, बैलसमिती अध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, मच्छिंद्र शेंडे, रमेश पाटील, जालिंदर जाधव, व्यस्थापक ज्ञानेश्वर वीर, विलास घुंडरे,शिवाजीराव रानवडे, नंदकुमार कुऱ्हाडे, रमेश कुऱ्हाडे, माऊलींचे मानकरी योगीराज कुऱ्हाडे पाटील, राहुल चिताळकर पा., कुंडलिक कुऱ्हाडे पा.,विठ्ठल घुंडरे पा.,ज्ञानेश्वर गुळूंजकर, विष्णू वाघमारे, सोमनाथ वाघमारे, रोहिदास तापकीर,
आनंदराव मुंगसे, प्रशांत कुऱ्हाडे, सचिन गिलबिले, उमेश रानवडे, किरण येळवंडे, सागर भोसले, संतोष भोसले, पांडुरंग भोसले व बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
https://youtu.be/QbKOYNCpSTM

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.