Chakan News : ॲमेझॉन कंपनीत दोन कामगारांचे भांडण; एकावर चाकूने वार

0

एमपीसी न्यूज – कंपनीत काम करत असताना दोन कामगारांमध्ये भांडण झाले. त्यात एका कामगाराने दुसऱ्या कामगाराला हाताने मारहाण करत चाकूने वार करून जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. 28) पहाटे म्हाळुंगे येथील ॲमेझॉन कंपनीत घडली.

_MPC_DIR_MPU_II

सोनू नबाजी गायकवाड (वय 23, रा. खराबवाडी, ता. खेड. मूळ रा. विद्यानगर, कुरुल रोड, मोहोळ, ता. मोहोळ, जि. सोलापूर) असे जखमीचे नाव आहे. त्याने याबाबत  चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अभिषेक वसंत वाघोले (रा. राक्षेवाडी, राजगुरुनगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गायकवाड आणि आरोपी वाघोले म्हाळुंगे येथील ॲमेझॉन कंपनीत काम करतात. बुधवारी पहाटे फिर्यादी पीकिंग विभागात काम करत होते. त्यावेळी फिर्यादी आणि आरोपी यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून शाब्दिक वाद झाला. त्यावरून आरोपीने फिर्यादी यांना मारहाण केली. त्यानंतर एका बाजूला पळत जाऊन चाकू घेऊन आला. त्याने फिर्यादी यांच्या गालावर, हातावर चाकूने वार करून जखमी केले. दरम्यान कंपनीतील इतर लोकांनी त्यांचे भांडण सोडविले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment