India Corona Update : देशात सव्वा दोन लाख सक्रिय रुग्ण, गेल्या 24 तासांत 20,539 जणांना डिस्चार्ज 

एमपीसी न्यूज – भारतात कोरोना रुग्ण वाढीला काही प्रमाणात ब्रेक लागला आहे. नव्यानं वाढ होणा-या रुग्णांपेक्षा बरे होणा-या रुग्णांची संख्या अधिक असून मागील 24 तासांत 20 हजार 539 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशात सध्याच्या घडीला 2 लाख 25 हजार 449 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात 18 हजार 139 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, 234 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 04 लाख 13 हजार 417 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 37 हजार 398 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

 

_MPC_DIR_MPU_II

देशभरात आजवर 1 लाख 50 हजार 570 एवढे रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. गेल्या 24 तासांत 234 रुग्ण दगावले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.44 टक्के एवढा आहे तर, रिकव्हरी रेट 96.38 टक्के एवढा आहे. आजवर देशात 17 कोटी 93 लाख 36 हजार 364 नमूणे तपासण्यात आले आहेत. गुरुवारी (दि.8) त्यापैकी 9 लाख 35 हजार 369 नमूणे तपासण्यात आले आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

 

 

महाराष्ट्रातील 30 जिल्हे व 25 महानगरपालिका क्षेत्रांत आज (शुक्रवार, दि.8) कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहीम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 3 आरोग्य संस्था व प्रत्येक महानगरपालिकेमध्ये 1 आरोग्य संस्था याठिकाणी ड्राय रन घेण्यात येणार आहे. पुणे, नंदुरबार, जालना, नागपूर या जिल्ह्यात तर, नागपूर व पिंपरी-चिंचवड या महानगरपालिका क्षेत्रात दोन जानेवारीला ड्राय रन घेण्यात आला होता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.