Pune : ए. आर. रेहमान यांच्या गाण्यांवर थिरकली तरुणाई

एमपीसी न्यूज – ‘ताल से ताल मिला’, ‘चोरी चोरी नंगे पाव’, ‘जिया जले जान जले’, ‘मरहाबा मरहाबा’, ‘मटक कली मटक कली’ अशी तरुणाईला आवडणारी उडत्या चालीची गाणी, त्याचबरोबर सैनिकांच्या, आईच्या भावना मांडणारे ‘लुका छुपी बहोत हुई’ आणि देशभक्ती जगवणारे ‘भारत हम को जान से प्यारा है’ अशा वैविध्यपूर्ण मेलडी गाण्यांनी तरुणाईला थिरकायला लावले.

ए आर रेहमान यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांवर आधारित ‘मोझर्ट ऑफ मद्रास’ कार्यक्रमाचे. पुणे नवरात्र महोत्सव समिती, फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २५ व्या पुणे नवरात्र महोत्सवात हा कार्यक्रम सादर झाला. यावेळी रमा कुलकर्णी, आशुतोष जोशी यांनी गायन, तर आरजे राहुल यांनी निवेदन केले. रोहन वनगे (ड्रमस), निनाद सोलापूरकर (कीबोर्ड), किरीट मंडवगने (गिटार), अमित गाडगीळ (गिटार) यांनी साथसंगत केली. शंकराचार्य यांचे शिष्य शंकरदत्त महाशब्दे, महोत्सवाचे संयोजक आबा बागूल, जयश्री बागूल, घनश्याम सावंत, नंदकुमार बानगुडे, नंदकुमार कोंढाळकर, रमेश भंडारी, जयवंत जगताप आदी यावेळी उपस्थित होते. टी. एस. पवार, वैभव देव, दीपक निकम, रमा कुलकर्णी यांचा सन्मानही प्रसंगी करण्यात आला.

‘मोझर्ट ऑफ मद्रास’ची सुरुवात ‘ताल से ताल मिला’ने झाली. त्यानंतर ‘दिल से रे दिल से रे’, ‘चंदा रे चंदा रे कभी तो जमीन पर आ’ आदी गाण्यांनी गणेश कला क्रीडामंच दुमदुमून गेला. ‘वंदे मातरम’ या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.