BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : मतदार जागृती करिता सर्व शाळांची एकत्रित रॅली

17 शाळांचा सहभाग; पथनाट्यातून जागृती

0

एमपीसी न्यूज – लोकशाही बळकट व सुदृढ करण्याकरिता प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क हा बजावलाच पाहिजे याकरिता निवडणूक आयोगाच्या स्वीप अंतर्गत मतदार जागृती अभियान सुरु आहे. लोणावळा शहरातील 17 शाळांनी सोमवारी या अभियानात सहभाग नोंदवत पथनाट्यातून मतदारांना मतदानाचा संदेश दिला.
मावळा पुतळा चौक ते लोहगड दर्शन उद्यान भांगरवाडी दरम्यान मतदार जागृती रॅली काढण्यात आली होती. यामध्ये डॉ. बी. एन. पुरंदरे बहुविध विद्यालय प्राथमिक विभाग, गुरुकुल विद्यालय, व्ही पी एस इंग्लिश स्कुल, डॉन बॉस्को, सेन्ट जोसेफ, ऑक्सिलीयम कॉन्व्हेंट, व्ही पी एस प्राथमिक शाळा, या शाळांनी पथनाट्य सादर करत मतदारांना मतदानांचे आवाहन केले. या रॅलीत सर्व शाळांचे विद्यार्थी घोषवाक्यांच्या बॅनर सहित सहभागी झाले होते.
HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3