Pimpri : पिंपरी-चिंचवडमधील विविध शाळांतून भरले क्रांतीगाथा प्रदर्शन 

प्रदर्शनांत ८६५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

एमपीसी न्यूज –  देश स्वतंत्र होण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. अशा थोर क्रांतिकारकांच्या स्मृतीला वंदन करणे तसेच या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रप्रेम निर्मण होणे त्याचप्रमाणे देशाभिमान निर्माण व्हावा हा उद्देश ठेवून क्रांतिदिनाच्या निमित्ताने महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय या न्यासाच्या वतीने पिंपरी-चिंचवडमधील विविध भागातील शाळांमधून क्रांतिकारकांच्या जीवनाविषयी माहिती असलेले सचित्र असे क्रांतिगाथा प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले  होते. सर्वच शाळेतील विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. शाळांमधून घेतलेल्या या प्रदर्शनाला ८६५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग लाभला.

क्रांतीगाथा प्रदर्शन घेतलेल्या शाळा – ज्ञानराज माध्यमिक विद्यालय, कासारवाडी पिंपरी-चिंचवड महापालिकेची छत्रपती शाहू महाराज प्राथमिक शाळा क्रमांक 1, कासारवाडी, पिंपरी-चिंचवड महापालिका वाल्हेकरवाडी प्राथमिक शाळा मुले क्रं.18/1, पिंपरी-चिंचवड महापालिका वाल्हेकरवाडी प्राथमिक कन्या शाळा क्रं.18, या शाळांमध्ये प्रदर्शन घेण्यात आले.

शाळेच्या मुख्याध्यापिका उर्मिला थोरात,  मंदाकिनी घोरपडे,  रोहिणी सुहास जोशी आणि कन्या शाळेचे मुख्याध्यापक कल्याण पंढरीनाथ खामकर यांचे सहकार्यामुळे उपक्रम यशस्वी झाला. विश्वनाथ अवघडे, शशिकला अवघडे,यांनी आयोजनात आपला सहभाग नोंदविला. शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापक यांचे यासाठी उत्तम सहकार्य मिळाले. यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.