Chakan : चाकण येथून एक रिक्षा तर धानोरे परिसरातून एक दुचाकी चोरीला

A rickshaw was stolen from Chakan and a two-wheeler was stolen from Dhanora area दररोज वाहन चोरीच्या घटना पोलीस ठाण्यात नोंदवल्या जात आहेत.

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड परिसरात वाहन चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. दररोज वाहन चोरीच्या घटना पोलीस ठाण्यात नोंदवल्या जात आहेत. चाकण येथून एक रिक्षा तर धानोरे तून एक दुचाकी गेली असून शुक्रवारी त्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

रिक्षा चोरीची घटना 30 जून रोजी सकाळी 11.30 वाजता राणुबाई मळा, चाकण येथे घडली. अनिल काळुराम केळकर ( रा. राणुबाई मळा, चाकण ता. खेड)  यांनी याबाबत शुक्रवारी (दि.3) चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी याबबाबत अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केळकर यांची 50 हजार किंमतीची काळ्या रंगाची रिक्षा (एमएच 14 एचएम 7660) त्यांच्याच घाराच्या मागच्या बाजूस लॉक करून पार्क केली होती. ही पार्क केलेली रिक्षा कोणी अज्ञात इसमाने चोरून नेली आहे. चाकण पोलिस तपास करत आहेत.
दुचाकी चोरीची घटना 23 जून रोजी सकाळी 11 वाजता मौजे धानोरे, ता. खेड येथे घडली.

 

पंढरीनाथ निवृत्तीनाथ बिरादार ( वय. 55, रा. शकुंतला अपार्टमेंट, बालाजी नगर, धनकवडी पुणे) यांनी याबाबत आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी याबबाबत अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिरादार यांची 35 हजार किंमतीची (एमएच 12 आरएल 4895) दुचाकी धानोरे गावच्या हद्दीतून सुलेमान बिरादार यांच्या फ्लॅट मधून अज्ञात इसमाने चोरून नेली आहे. आळंदी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.