Chikhali : चिखलीत सोसायटीच्या पार्किंगमधून रिक्षा चोरीला

एमपीसी न्यूज – सोसायटीच्या पार्किंगमध्ये (Chikhali) पार्क केलेली रिक्षा चोरट्यांनी रात्रीच्या वेळी चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. 29) सकाळी हनुमान सोसायटी म्हेत्रेवस्ती चिखली येथे उघडकीस आली.

गिरीश गोविंद इतापे (वय 26, रा. म्हेत्रेवस्ती, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

New Sangavi : 40 टक्के परताव्याचे आमिष दाखवत 23 लाखांचा गंडा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी (Chikhali) त्यांची 90 हजार रुपये किंमतीची रिक्षा सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. बुधवारी (दि. 28) रात्री नऊ ते गुरुवारी (दि. 29) सकाळी साडेसहा या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी रिक्षाचे हॅण्डल लॉक तोडून रिक्षा चोरून नेली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.