Sudhakar Khardekar Passed Away: रा. स्व. संघ व विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुधाकर खर्डेकर यांचे निधन

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विश्व हिंदू परिषदेचे श्रीगोंदा येथील ज्येष्ठ कार्यकर्ते सुधाकर गणेश खर्डेकर (वय 78) यांचे नुकतेच तळेगाव दाभाडे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, पुतणे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. चाकण येथील टेट्रा पॅक कंपनीतील वरिष्ठ अधिकारी महेश खर्डेकर यांचे ते काका होत. 

नगर अर्बन बँकेत प्रदीर्घ सेवा करून त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बालपासून स्वयंसेवक होते. संघ परिवारातील समर्पित कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती. विश्व हिंदू परिषदेच्या कामातही त्यांचे मोठे योगदान होते. आयोध्येत झालेल्या कारसेवेतही ते सहभागी झाले होते. नगर व पुणे जिल्ह्यातील अनेक स्वयंसेवकांसाठी ते प्रेरणास्थान होते.

ऊसतोड कामगार व विटभट्टी कामगार यांच्या मुलांसाठी तसेच अजनुज व भानगाव येथे भटके विमुक्तांसाठी वस्तीगृह चालविले जायचे. त्यासाठी खर्डेकर संस्कृत व संस्कार वर्ग घेत असत. जीवनाच्या अखेरच्या टप्प्यात त्यांच्या श्रीगोंदा येथील घरातून चालविल्या जाणाऱ्या जनकल्याण समितीच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णोपयोगी साहित्य केंद्राचे सर्व काम ते पहात होते.

श्रीगोंद्यातील कार्यकर्त्यांचा हरपला ‘जय श्रीराम’ !

त्यांच्या नावाने श्रीगोंदा येथे सुधाकर खर्डेकर (सुख) चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. त्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. त्यांना लिखाण व वाचनाची प्रचंड आवड होती. त्यांनी स्वत: ‘अभंगगाथा’ हा ग्रंथ लिहिला होता.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.