Pune News : मॉर्निंगवॉक साठी निघालेल्या जेष्ठ नागरिकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

एमपीसी न्यूज : मॉर्निंग वॉक साठी निघालेल्या एका ज्येष्ठ नागरिकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झालाय. बुधवारी सकाळी विश्रांतवाडी येथील गोकुळ नगर बस स्टॉप समोर सकाळी सहा ते साडेसात च्या दरम्यान हा प्रकार घडला आहे.

गुलाब साहेबराव मुरगुंडे (वय 61, रा. लक्ष्मी निवास भैरवनगर धानोरी) असे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकाचे नाव आहे. या प्रकरणी संदीप गुलाब मुरगुंडे (वय 37) यांनी फिर्याद दिली असून अज्ञात वाहन चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की फिर्यादी यांचे वडील गुलाब मुरगुंडे हे दररोज मॉर्निंग वॉक साठी घराबाहेर जात होते. बुधवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉक गेले असताना हा अपघात झाला. भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. विश्रांतवाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निकम करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.