Pune News : संपूर्ण पुणे शहरावर पसरली दाट धुक्याची चादर

एमपीसी न्यूज : मागील दोन दिवसांपासून पुणे शहरात पहाटेच्या सुमारास धुक्याचे प्रमाण वाढले आहे. थंडीचा कडाका वाढत असताना सकाळी दूरपर्यंत धुके दाटले आहे. शहरातील रस्ते आणि इमारती या धुक्यामध्ये हरवून गेल्याचे चित्र आज पहाटेपासून दिसत आहे. सकाळी फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांनी या धुक्याचा आनंद घेतला.

मागील तीन दिवसांपासून पुण्यात थंडी वाढत आहे. त्यानंतर आज संपूर्ण पुणे शहर धुक्याखाली झाकोळले आहे. धुके इतके दाट होते की काही अंतरावरचे ही दिसत नव्हते. त्यामुळे पहाटे घराबाहेर पडलेल्या पुणेकरांनी धोक्याचा आनंद मनमुराद लुटला.

पुणे शहराच्या आसपास अनेक टेकड्या आहेत. या टेकड्यांवर मॉर्निंग वॉक साठी जाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.. पर्वती, वेताळ टेकडी, हनुमान टेकडी, तळजाई यासारख्या टेकड्यांवर पहाटे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्यानागरिकांना आज हे धुके पहायला मिळाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.