Pune News : सिंहगड रस्ता पोलीस स्टेशनच्या हद्दीत पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून 

एमपीसी न्यूज : पुण्यात सिंहगड रस्ता पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका टोळक्याने दुसऱ्या टोळक्यावर तलवारीने अन् कोयत्याने सपासप वार करत एकाचा निर्घृण खून केला. तर यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. बुधवारी रात्री हा प्रकार घडला. सिंहगड रस्ता पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

श्याम सोनटक्के (वय 24) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर यात योगेश चव्हाण (वय 19) हा तरुण जखमी झाला आहे.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, श्याम सोनटक्के, योगेश चव्हाण आणि त्याचे काही मित्र जाधवनगर परिसरातील मोकळ्या जागेत मद्यपान करण्यासाठी बसणार होते. त्यानुसार त्यांची तयारी सुरू होती. त्याच वेळी आरोपी आणि त्याचे काही मित्र त्या ठिकाणी आले. पूर्ववैमनस्यातून त्यांनी एकमेकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आरोपींच्या हातात कोयते होते. या कोयत्याने त्यांनी श्याम, योगेश आणि त्याच्या मित्रावर वार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात श्याम सोनटक्के याचा मृत्यू झाला तर योगेश चव्हाण हा गंभीर जखमी झाला आहे.

रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडल्याने या परिसरात काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली असून सिंहगड पोलिस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.