Pimple Saudgar : अभ्यास केला नाही म्हणून सहा वर्षांच्या विद्यार्थिनीला मारहाण

एमपीसी न्यूज – अभ्यास केला नाही म्हणून यु केजीच्या वर्गात शिकणा-या सहा वर्षांच्या बालिकेला शिक्षकाने मारहाण केली. ही घटना पिंपळे सौदागर येथे घडली.

मुलीच्या पालक कोमल दीपक पवार (वय 25) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पवार यांची मुलगी देविका पिंपळेसौदागर येथील लक्ष्मीनगरच्या अभिलाषा फेरीटल स्कुलमध्ये शिकत होती. देविका हिला अभ्यास केला नाही म्हणून शिक्षकाने गालावर चापट मारली. तसेच हातातील प्लास्टिक पट्टीने पायावर मारले. त्यामुळे दुखापत झाली. केअर आॅफ प्रोटेकशन आॅफ चिल्ड्रेन या कायद्यानुसार शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.