Pimpri News : ‘सोळावं वरीस मोक्याचं’, 15 ते 21 वयोगटातील युवांसाठी 5 जून रोजी विशेष मार्गदर्शनपर शिबिर

एमपीसी न्यूज – जीवनविद्या मिशनतर्फे 15 ते 21 वयोगटातील युवांसाठी 5 जून 2022 रोजी ‘सोळावं वरीस मोक्याचं’ यावर एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या वयोगटातील युवांना पडणा-या अनेक प्रश्नांची आणि त्यांच्या मनातील गोंधळाचे निवारण करणारे विशेष मार्गदर्शन या शिबिरात केले जाणार असल्याचे अमर गावडे यांनी सांगितले.

पिंपरी, संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे सभागृहात 5 जून 2022 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी नाव नोंदणी करणे बंधनकारक आहे. युवकांना 9822554463 या मोबाईलवर संपर्क साधून नावनोंदणी करता येईल. नोंदणी शुल्क 300 रुपये (दुपारच्या जेवणासह) असणार आहे.

या शिबिरात ”सोळावं वरीस मोक्याचं”, “प्रेमाचे गोड गुपित”, “सावध तो सुखी” यावर मार्गदर्शन केले जाणार आहे. 15 ते 21 या युवा वयात असताना खूप मोठी स्वप्न पाहत असतो. बिनधास्त जगत असतो. कॅफे, सेल्फी, चॅट्स मध्ये युना स्टेट्स अपडेट करत असतो. पण, Reels फॉरवर्ड करता करता मात्र रियल लाईफमध्ये बॅकवर्ड जातो. कारण, करियरसाठीचा अचूक मेंटॉर मित्रांच्या लिस्टमध्ये नसतो.

या वयात युवांना पडणा-या अनेक प्रश्नांची आणि त्यांच्या मनातील गोंधळाचे निवारण करणारे विशेष मार्गदर्शन या शिबिरात केले जाणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 15 ते 21 वयोगटातील युवांनी मोठ्या संख्येने नाव-नोंदणी करावी. शिबिराला उपस्थित राहून आयुष्याचा पासवर्ड मिळवावा, असे आवाहन आयोजकांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.