Talegaon : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ग्रामदैवत डोळसनाथ महाराज मंदिरात नेत्रदीपक भव्य दीपोत्सव

एमपीसी न्यूज – त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंगळवारी (दि.19) सायंकाळी ६.३० वा. डोळसनाथ महाराज मंदिरात विविध फुलांच्या आकर्षक सजावटीसह सामाजिक संदेश देणाऱ्या विविध रांगोळ्या काढून नयनरम्य सजावट करण्यात आली होती.

जागृत ग्रामदैवत डोळसनाथ महाराजांच्या सभामंडपात “तेज स्त्रीशक्तीचे…. घडवी जी पिढीला, घरादाराला अन देशाला… त्या स्त्रीशक्तीच्या तेजाने एक दिवा उजळला…!!” या संकल्पनेतून  काढण्यात आलेल्या भव्य रांगोळीच्या आवती भोवती तब्बल  ५ हजार आकर्षक दिव्यांची आरास करून परिसर प्रकाशमान करून नयनरम्य, भव्य दिव्य व  अतिशय सुंदर असा दीपोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी स्वामी समर्थांची स्त्री रूपातील रांगोळी, महिला सशक्तीकरण,सर्व धर्म समभाव, ओला दुष्काळ, नारी शक्ती, आदिशक्तीची पूजा अशा विविध सामाजिक रांगोळ्यांद्वारे सामाजिकतेचा संदेश देण्यात आला. त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा, असुरांचा व अंधकारमय बाबींचा नाश केला आणि मानवाला प्रकाशमान जीवन प्राप्त करुंन दिले. या अनुषंगाने फुलांतून साकारण्यात आलेल्या भगवान शंकराच्या त्रिशूल व डमरू यांची पूजा अर्चना ही करण्यात आली.

दीपोत्सवाचे उद्घाटन मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, माजी नगराध्यक्ष रवींद्र दाभाडे, नगरसेवक सुशील सैंदाणे, नगरसेविका मंगल भेगडे, वैशाली दाभाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्वांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

डोळसनाथ पतसंस्था व नगरसेवक संतोषभाऊ भेगडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने साकारण्यात आलेल्या दीपोत्सवाचे हे चौथे वर्ष असून यावेळी उपक्रमाचे आयोजक नगरसेवक संतोष भेगडे, डोळसनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष शरद भोंगाडे, यांच्या समवेत तळेगाव शहर अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस ज्योती शिंदे, पत्रकार सुनील वाळुज, राजेंद्र सरोदे, ह.भ.प. माउली दाभाडे, सुनीता काळोखे, शोभा भेगडे, संध्या देसाई, उर्वशी भेगडे, दत्ताभाऊ भेगडे संस्थेचे उपाध्यक्ष राहुल पारगे, सचिव सतीश भेगडे, खजिनदार निलेश राक्षे, संचालक अतुल राऊत, वैभव भेगडे, शंकर भेगडे, माळवाडी ग्रामचे उपसरपंच गणेश आल्हाट, आदी मान्यवर व तरुण ऐक्य मित्र मंडळ सर्व कार्यकर्ते, डोळसनाथ पतसंस्थेचे सर्व महिला बचत गट, डोळसनाथ तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते, व तळेगावासह पंचक्रोशीत असंख्य नागरिक उपस्थित होते.

मागील तीन वर्षांपासून साकारत असलेल्या दीपोत्सवाच्या यंदाच्या चौथ्या वर्षीही उपक्रमाला भाविकांचा बहुमोल प्रतिसाद लाभल्याबद्दल उपक्रमाचे आयोजक नगरसेवक संतोषभाऊ भेगडे यांनी सर्वांचे आभार मानले. डोळसनाथ तालीम मित्र मंडळाचे विशेष सहकार्य लाभले. प्रकाश योजना व सजावट राकेश मुघल यांनी केली होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल धर्माधिकारी यांनी केले. तमाम उपस्थितांचे स्वागत नगरसेवक संतोषभाऊ भेगडे यांनी केले. कुलकर्णी यांच्या सुमधुर भक्ती – संगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.