Hadapsar : हडपसरमध्ये रंगला राज्यस्तरीय सेना केसरी कुस्तीचा महासंग्राम

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या (Hadapsar) वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या भव्य सेना केसरी राज्यस्तरीय कुस्ती सामन्याचा उदघाट्न समारंभ शुक्रवारी थाटामाटात संपन्न झाला. प्रसिद्ध उद्योजक पुनीत बालन, अप्पर पोलीस अधिक्षक ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, हिंदकेसरी अभिजित कटके, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. चार दिवसीय पार पडत असलेल्या या सामन्यात, राज्यभरातून अनेक मल्लांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. 

लोकाश्रय असणाऱ्या कुस्तीला राजाश्रय मिळवून देण्यासाठी तसेच मल्लांचा यथोचित सन्मान करण्यासाठी रांगड्या मातीतील हे सामने आयोजित करण्यात आल्याचे शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी सांगितले, तब्बल 600 मल्ल या स्पर्धेत सहभागी झाली आहेत. शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे संकल्पनेतून, आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय भव्य सेना केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा 2024 ही स्पर्धा हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदान, जे. एस. पी. एम. कॉलेज शेजारी, हांडेवाडी, हडपसर पुणे येथे अत्यंत चुरशीची अशी स्पर्धा मोठ्या दिमाखात पार पडत आहे.

विशेष म्हणजे वियजी मल्लांसाठी ठेवण्यात आलेली, बक्षीसे हे आकर्षणाचा विषय ठरत आहेत. यामध्ये प्रथम क्रमांक आलेल्या मल्लास रोख रक्कम 5 लक्ष रुपये, चांदीची गदा व बुलेट मिळणार आहे. तर द्वितीय क्रमांकास 3 लक्ष व सन्मान चिन्ह, तृतीय क्रमांकास 2 लक्ष व सन्मान चिन्ह व चतुर्थ क्रमांकास 1 लक्ष व सन्मान चिन्ह अशा स्वरूपाची बक्षिसे मिळणार आहेत. तसेच विविध वजनीगटातील स्पर्धकांना 35 लाखांची बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहेत.

दरम्यान,या स्पर्धेला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे मोठे मार्गदर्शन (Hadapsar) लाभणार आहे. यावेळी पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त प्रसाद काटकर,बाळासाहेब ढवळे, उद्योगपती बाळासाहेब भानगिरे, उपमहाराष्ट्र केसरी अशोक माने, हरियाणाचे राजू पैलवान, अंकुश मामा घुले ,राजेंद्र जरांडे, मोहन हगवणे, राजेंद्र घुले, नानासाहेब पठारे,मकरंद केदारी,राजेंद्र भानगिरे,निलेश माझीरे,श्रीकांत पुजारी,लक्ष्मण आरडे, अभिजीत बोराटे, सुदर्शना त्रिगुणाईत,श्रद्धा शिंदे, सचिन थोरात, नितीन लगस व मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. या स्पर्धेचे बक्षीस वितरण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.