Talegaon Dabhade : क्रीडा छंदाला उपजिविकेचे माध्यम बनवा – रामदास काकडे

एमपीसी न्यूज – शिक्षकांनी विद्यार्थी घडवताना खडतर परिश्रम, खेळाची शास्त्रशुद्ध माहिती आणि सचोटी या त्रिसूत्रीवर भर द्यावा. त्यातून अनेक क्रीडापटू नावारूपाला येतील. मावळच्या क्रीडा समृद्धतेत निश्चित भर पडेल. क्रीडा छंदाला उपजिविकेचे माध्यम बनविले तर चरितार्थाच्या उत्तम संधी उपलब्ध होतील. त्यासोबत उत्तम आरोग्य व जगण्याचे समाधानही प्राप्त होईल, असे प्रतिपादन इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी केले.

इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या आठ एकरवरील भव्य क्रीडांगणाचे उद्घाटन आज रविवार (दि ४) रोजी संपन्न झाले. यावेळी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, विश्वस्त विलास काळोखे, संदीप काकडे, संजय साने, युवराज काकडे, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष रघुवीर शेलार, प्राचार्य डॉ संभाजी मलघे,उपप्राचार्य अशोक जाधव, डी फार्मसीचे प्राचार्य जी.एस. शिंदे, मावळ तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष महादेव माळी आदीजण उपस्थित होते.

Maval : हमी भावाने भात खरेदी अन् तात्काळ पैसे मिळाल्याने मावळ मधील भात उत्पादक शेतकरी सुखावला

मावळची क्रीडा समृध्दता संपन्न आणि सर्वश्रुत आहे याचा दाखला देत संस्थेचे अध्यक्ष काकडे यांनी आंद्रे आगासी, खाशाबा जाधव, हरिश्चंद्र बिराजदार, मारूती माने, सचिन तेंडुलकर अशा दिग्गज क्रीडा साधकांच्या कठोर साधनेबद्दल विद्यार्थांना मार्गदर्शन केले. या भव्यदिव्य क्रीडांगणावर हजारो क्रीडापट्टू घडावेत असा आशावाद काकडे यांनी व्यक्त करत सर्व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे म्हणाले की, जय- पराजयाच्या पलिकडे जाऊन स्वतःला क्रीडाप्रेमींनी, क्रीडापट्टूंनी सदैव सिद्ध करावे हे खरे आव्हान असते.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मलघे यांनी महाविद्यालयाच्या उज्ज्वल क्रीडा वारशाचा मागोवा घेत महाविद्यालयीन क्रीडा घडामोडीचा लेखा-जोखा उपस्थितांसमोर मांडला, यावेळी सर्व क्रीडांपट्टूंना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शारीरिक शिक्षण संचालक डॉ सुरेश थरकुडे यांनी केले तर क्रीडा शारीरिक शिक्षण संचालिका प्रतिभा गाडेकर यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.