Chinchwad : ‘तू माझ्याकडे का बघतोस’ असे म्हणत तोंडावर दगड मारला

एमपीसी न्यूज – मित्रासोबत चहा पिण्यासाठी जात असताना बघितल्याच्या रागातून एकाने तरूणाला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच ‘तू माझ्याकडे का बघतोस’ असे म्हणत तोंडावर दगड मारला. ही घटना चिंचवड स्टेशन येथे घडली.

अमोल गंगाराम सोनवणे (वय 21, रा. आनंदनगर, चिंचवड स्टेशन) याने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ससा उर्फ सुरज वाघमारे आणि स्वप्निल माडेकर (दोघे रा. आनंदनगर, चिंचवड स्टेशन) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल हा मित्रासमवेत चहा पिण्यासाठी चालला होता. भुवनेश्वर चहाच्या टपरीजवळ अमोलने आरोपी सुरज याच्याकडे पाहिले. त्यावर सुरजने त्याला ‘तू माझ्याकडे का बघतोस’ , अशी विचारणा करत शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच दगडाने तोंडावर मारत गंभीर जखमी केले. यावेळी झालेल्या झटापटीत अमोलच्या गळ्यातील सोनसाखळी, अंगठी, मोबाईल पडून गहाळ झाला. चिंचवड ठाण्याचे फौजदार आवटे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.