Pimpale Saudagar : उन्न”ती” च्या गणपती महोत्सवाची मानाची आरती महिला शिक्षकांच्या हस्ते

एमपीसी न्यूज : उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व शिक्षकदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने बसवण्यात येणाऱ्या “ती” च्या गणपती महोत्सवामध्ये आज शिक्षक दिनानिमित्त महिला शिक्षकांच्या हस्ते आरती करण्यात आली.

याप्रसंगी उन्नती फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, उन्नती सोशल फाऊंडेशनचे संस्थापक संजय भिसे, पी.के.इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक जगन्नाथ काटे, उन्नती सोशल फाऊंडेशन संचलित विठाई वाचनालयाचे अध्यक्ष सुभाष पवार, आनंद हास्य कल्बचे सभासद, रमेश वाणी, तात्या शिनगारे, यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व उन्नती सोशल फाऊंडेशनचे सभासद उपस्थित होते.

या निमित्ताने पिंपळे सौदागर येथील पी.के.इंटरनॅशनल स्कूलमधील शिक्षकांचा सत्कार उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आला, यावेळी  दरवर्षी साजरा करण्यात येणारा “ती” चा गणपती महोत्सवामध्ये गणरायाची पूजा व आरती समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांकडून करण्यात येते. शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षकदिनाची आरती शिक्षक महिलांकडून करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like