Bal Sanskar Shibir : आळंदीत तीन दिवसीय बाल संस्कार शिबीर उत्साहात

एमपीसी न्यूज : आळंदी येथील श्री विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज सेवा मंडळाचे वृंदावन कॉलनीत तीन दिवसीय बाल संस्कार शिबीराचे (Bal Sanskar Shibir) आयोजन विविध उपक्रमांनी उत्साहात करण्यात आले.

या शिबिराचे उद्घाटन डॉ. नारायण महाराज जाधव यांच्या हस्ते हरिनाम गजरात झाले. यावेळी गणेश गरुड यांनी मुलांना बोधपर गोष्टी सांगून मार्गदर्शन केले. या शिबिराला गुरुवर्य मारोती महाराज कुरेकर, गुरुवर्य विष्णुबुवा चक्रांकित, गुरुवर्य अशोक महाराज पांचाळ, गुरुवर्य शंकर महाराज पांचाळ यांचे आशीर्वाद मिळाले. तीन दिवसीय शिबिरात सोहम पांचाळ, ज्ञानेश्वर जाधव, रविंद्र जोशी, भागवत दळवी, कृष्णा नलावडे, सोहम शाम गोराणे, नरसिंह पांचाळ, डॉ निखील सोनवणे, डॉ आनंद बुचके यांनी (Bal Sanskar Shibir) मुलांना मार्गदर्शन केले.

समारोप संयोजक अध्यक्ष रेणुकादास पांचाळ, गणेश राऊत, दत्तात्रय सुतार, गणेश सुरवसे, रवींद्र रायकर, बाळासाहेब गरुड, गंगाधर पांचाळ, श्रावण जाधव, उत्तम अवघड, अशोक सुतार, रोहन पांचाळ, आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, सामाजिक कार्यकर्ते हमीद शेख, प्रियंका गंधट, शुभांगी पांचाळ, वैभवी पांचाळ, मनीषा शेळके, सोनल अवघड हे मान्यवर उपस्थित होते.

Dr.Nanasaheb Dharmadhikari Pratishthan : पुणे महानगरपालिका व डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने स्वच्छता अभियानाचे आयोजन

शिबिरातील मुलांनी व पालकांनी मनोगत व्यक्त केले, अशी शिबिरे ही काळाची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. शिबिरात प्राविण्य मिळविलेल्या मुलांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पारितोषिके देण्यात आली.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष रेणुकादास पांचाळ, उपाध्यक्ष गणेश राऊत, खजिनदार गोरखनाथ पांचाळ, सचिव नरसिंह पांचाळ, सदस्य रोहन पांचाळ, सच्चिदानंद पांचाळ, सूर्यकांत पांचाळ, वसंत पांचाळ यांनी परिश्रम घेतले. शिबिराची सांगता पसायदानाने झाली. शेवटी मुलांना खाऊ वाटप झाले.

https://www.youtube.com/watch?v=HoQRcW2NMAI

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.