New coronavirus strain : भारतात कोरोना विषाणूच्या नव्या ‘स्ट्रेन’चे एकूण २० रुग्ण आढळले

एमपीसी न्यूज : जगभरात नव्या वर्षीच्या सेलिब्रेशनची तयारी सुरू असतानाच कोरोनाच्या नव्या रुपानं संक्रमित केल्याचंही समोर आलंय. ब्रिटनवरून भारतातही नव्या स्वरुपातील कोरोना दाखल झालाय. भारतात कोरोना विषाणूच्या नव्या ‘स्ट्रेन’चे एकूण २० रुग्ण आढळले आहेत. बुधवारी भारत सरकारकडून ही माहिती देण्यात आलीय.

युनायटेड किंगडम (UK) वरून भारतात दाखल झालेल्या २० जणांमध्ये करोनाचे हे नवे स्ट्रेन आढळले आहेत. यातील तीन बंगळुरू, दोन हैदराबाद आणि एक पुण्याच्या लॅबमध्ये करण्यात आलेल्या चाचण्यांत नवा स्ट्रेन आढळला आहे.

ब्रिटनमधून भारतात आलेल्या रुग्णांच्या जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात आली होती. याचा रिपोर्ट  बुधवारी  जाहीर करण्यात आला. यातील वेगवेगळ्या लॅबमध्ये करण्यात आलेल्या सेक्शनबद्दल माहिती देण्यात आलीय.

मिळालेल्या माहितीनुसार, २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबरपर्यंत यूकेहून जवळपास ३३ हजार लोक भारतात दाखल झाले. या सर्वांना ट्रॅक करून त्यांच्या करोना चाचण्या करण्यात आल्या. यातील एकूण ११४ जण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

या रुग्णांचे नमुने देशातील वेगवेगळ्या १० लॅबमध्ये (कोलकाता, भुवनेश्वर, एनआयव्ही पुणे, सीसीएस पुणे, सीसीएमबी हैदराबाद, सीसीएफडी हैदराबाद, इन्स्टिम बंगळुरू, निमहंस बेंगलुरू, आयजीआयबी दिल्ली, एनसीडीसी दिल्ली) चाचणीसाठी पाठवण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.