Mulshi : राजगडाच्या पायथ्यालाच मुळशीतील पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

एमपीसी न्यूज – किल्ले राजगड (ता. वेल्हे) येथे पर्यटनासाठी (Mulshi) आलेल्या तरुणाचा बालेकिल्ल्याच्या पायथ्याला हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून या तरुणास वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले, परंतु ते असफल झाले. हि घटना रविवारी (दि.12) दुपारी बाराच्या दरम्यान घडली असून दीपक दिनकरराव सुकळीकर (वय 35) राहणार भुकूम (तालुका मुळशी) असे तरुणाचे नाव आहे.

याबाबत राजगड किल्ल्याचे पुरातत्व विभागाचे कर्मचारी बापू साबळे यांनी माहिती देताना म्हंटले, की रविवार असल्यामुळे पर्यटकांची किल्ल्यावरती मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यापैकी एका ग्रुपमधील सदस्य दीपक सुकळीकर हे बालेकिल्ला उतरताना चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी पुरातत्व विभागाचे कर्मचाऱ्यांनी धाव घेतली.

कर्मचारी विशाल पिलावरे, आकाश कचरे, दीपक पिलावरे यांनी उपस्थित काही पर्यटकांच्या मदतीने दीपक यास राजगड किल्ल्यावरील बालेकिल्ल्यापासून स्ट्रेचरच्या सहाय्याने खंडोबा माळ येथे मोठ्या जिकरीने खाली आणले.

Pune News : धक्कादायक! पुण्यातील गुगल ऑफिस बॉम्बने उडवण्याची धमकी

दरम्यान, 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेस संपर्क केल्यामुळे रुग्णवाहिकेचे (Mulshi) वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राहुल बोरसे व चालक तुषार येनपुरे यांनी बेशुद्ध तरुणास प्राथमिक उपचार केले, परंतु उपचारास प्रतिसाद देत नसल्याने त्यास तातडीने वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

प्राथमिक तपासणी केल्यानंतर वेल्हे ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर चंद्रकांत भोईटे यांनी दीपक सुकळीकर हे उपचारापूर्वी मयत झाल्याचे घोषित केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.