Visapur Fort : विसापूर किल्ला परिसरात फिरायला आलेला एक पर्यटक जखमी 

एमपीसी न्यूज –  मावळ तालुक्यातील लोणावळाजवळील विसापूर किल्ला परिसरात (Visapur Fort) फिरायला आलेला एक पर्यटक जखमी झाल्याची घटना सोमवारी घडली आहे.

 

 

यश मेहता असे या पर्यटकाचे नाव आहे व तो शेजारील रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्याचा  रहिवासी आहे.
विसापूर किल्ला परिसरात एक युवा पर्यटक पडला असल्याची माहिती लोणावळा येथील शिवदुर्ग रेस्कु संस्थेला मिळाली. त्यांच्या संस्थेचे सदस्य व स्थानिक ग्रामस्थ किल्ल्याकडे गेले. त्यांनी जखमी यशला जंगलातून बाहेर आणले व त्याच्यावर प्रथमोपचार केले.

गेला एक आठवडा लोणावळा व आसपासच्या परिसरात मुसळधार (Visapur Fort) पाऊस पडत आहे. त्यामुळे नदी, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत.  अनेक धबधबे पण वाहू लागले आहेत.

 

Today’s Horoscope 12 July 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

 

 

या नयनरम्य निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पुणे ज़िल्हातीलच नव्हे तर राज्याच्या विविध भागातून पर्यटक या परिसरात वर्षाविहारासाठी येता आहेत. पाऊलवाटा, रस्ते निसरडे झाले आहेत. त्यामुळे पर्यटकांनी चालताना काळजी घ्यावी, असे आवाहन शिवदुर्ग रेस्कु टीमने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.