Rahatni News : रहाटणीत रात्री एका सोसायटीमध्ये झाड पडले

एमपीसी न्यूज – रहाटणीत बुधवारी रात्री एका सोसायटीमध्ये झाड पडल्याची घटना घडली होती.

अग्नीशमन दलाच्या पिंपरी चिंचवड महापालिका विभागाच्या पिंपरी  मुख्यालयाने सांगितले की, रहाटणीमधील राम मंदिराजवळील के के सोसायटीमध्ये बुधवारी रात्री 9.30 च्या सुमारास झाड पडले होते.झाडाच्या काही फांद्या सोसायटीच्या आवारात पडल्या होत्या तर काही फांद्या बाहेर रस्त्यावर पडल्या होत्या.

पिंपरी मुख्यालयाचे व रहाटणी अग्निशमन केंद्राचे प्रत्येकी एक अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचले होते.अग्निशमन कर्मचाऱ्यांनी सोसायटीच्या आवारात पडलेल्या फांद्या व रस्त्यावरील फांद्या कापून दूर केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.