Subodh Vidyalay : स्वर्गवासी मित्रांची आठवण म्हणून माजी विद्यार्थ्यांनी सूबोध विद्यालयात लावलं मैत्रीचं झाड

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील संभाजीनगर येथील सुबोध माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यानी आपले स्वर्गवासी मित्र कै.अक्षय गायकवाड, कै.रोहित आझाद आणि कै.अक्षय बिडकर या विद्यार्थ्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या आठवणीच झाड (Subodh Vidyalay) लावले आहे.

या विद्यार्थ्यांच्या आठवणी वृक्षारुपात साठवून आपल्या मैत्री या वृक्षरुपी मित्रासोबत जपण्यासाठी या वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुबोध माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग तसेच माजी विद्यार्थी यांच्या हस्ते स्वर्गवासी माजी विद्यार्थी यांच्या नावाने वृक्षारोपण करण्यात आले.

Aditya Murder Case : लहान मुलांसाठी एक विशेष कायदा करण्याची गरज – विरोधीपक्ष नेते अजित पवार

यावेळी माजी विद्यार्थी कोमल घोडके, हवरगी, गौरी माळी बाविस्कर, सूरज कसबे, शुभम काशिद, जगदीश चव्हाण, ऋषिकेश भींगारदे, संकेत पवार, वैभव वाळुंज, प्रदीप खट, महेश जाधव हे आपल्या स्वर्गवासी मित्रांच्या आठवणी मध्ये भाऊक झाल्याचे दिसून (Subodh Vidyalay) आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.