Nigdi : प्राधिकरणात दोन दिवस संगीत महोत्सव

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने, भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी संगीत अकादमी, वर्धापन दिनानिमित्त भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी महोत्सव-2023 चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव आज (गुरूवार) आणि उद्या (शुक्रवार) होणार आहे.

Maval : शिवशाही मित्र मंडळाच्या वतीने दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

प्राधिकरणातील ग.दि.माडगुळकर नाटयगृहात हा महोत्सव होणार आहे. संगीत अकादमीमध्ये शास्ञीय गायन, हार्मोनियम वादन, तबला वादन, सुगम संगीत यांचे प्रशिक्षण दिले जाते. संगीत अकादमीमधुन अनेक उदयोन्मुख कलाकार नावारुपास आले. संगीत शिक्षणा बरोबरच विविध शैक्षणिक आणि सांगितिक उपक्रमाचे आयोजन महानगरपालिकेचे वतीने केले जाते. त्यास अनुसरुन यावर्षी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी महोत्सव 2023 चे आयोजन केलेले आहे.

त्यानिमित्ताने नामवंत कलाकरांचे कला सादरीकरण या महोत्सवात होणार आहे. हा कार्यक्रम शहरवासीयांसाठी विनामुल्य असून जास्तीत जास्त रसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन क्रीडा विभागाचे उपायुक्त मनोज लोणकर यांनी केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.