Chakan : दुचाकीस्वाराचा ट्रकखाली चिरडून मृत्यू

A two wheeler rider costs his life after knocked down by truck.

0

एमपीसी न्यूज – ट्रकच्या दोन्ही चाकाखाली चिरडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 18) पहाटे पाचच्या सुमारास म्हाळुंगे येथील सिम्मा ए वन कंपनीच्या गेट समोर घडली.

ज्ञानेश्वर भगवंत सांडभोर (वय 50) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अनिल बाबुराव शिंदे (वय 39, रा. निघोजे, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार प्रकाश प्रभाकरराव महाडोरे (वय 31, रा. सिंदमिंगे वॉर्ड नंबर तीन, ता. जि. वर्धा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ट्रक चालक सोमवारी पहाटे म्हाळुंगे येथून जात होता. सिम्मा ए वन कंपनीच्या गेट समोर ट्रक (एम एच 32 / ए जे 6579) आला.

त्यावेळी फिर्यादी यांचे मेहुणे दुचाकीवरून जात होते. ट्रकने त्यांना पाठीमागून धडक दिली. त्यात ज्ञानेश्वर सांडभोर ट्रकच्या क्लीनर साईडच्या पुढील व मागील बाजूच्या चाकाखाली चिरडले गेले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like