Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे येथे 17 व 18 जून रोजी भरणार रोटरी फेस्ट हे अनोखे प्रदर्शन

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) यांच्या अंतर्गत दि 17 व 18 जून रोजी सुशीला मंगल कार्यालय येथे रोटरी फेस्ट हे अनोखे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.

Khed : रुग्णवाहिका आणि टेम्पोची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, तिघेजण जखमी

सेंद्रीय, आयुर्वेद, निसर्गोपचार याच्यावर आधारित उत्पादनांना , शेतकरी, आयुर्वेद ऊत्पादक, याना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी हे प्रदर्शन आणि विक्री आयोजित करण्यात येत आहे. यासाठी मावळातील तसेच महाराष्ट्रातून अनेक विध उत्पादनांचे विक्रेते सहभागी होणार आहेत. या सर्व उत्पादनांची जाहिरात क्लब च्या माध्यमातून करण्यात येईल असे क्लबचे अध्यक्ष अनिश होले यांनी सांगितले.

यामध्ये देशी गाई पासूनची सर्व सर्व ऊत्पादने, नैसर्गिक गुळ, शुद्ध मध, हातसडीचा तांदुळ, ई उत्पादने या ठिकाणी वाजवी किमतीप्रमाणे  विकत घेता येणार आहेत. तसेच पदार्थाबाबतची सर्व माहिती ही या प्रदर्शनात भेट देणाऱ्यांना मिळेल.

आज केमिकल युक्त आहार खूप मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. त्यामुळेच मधुमेह, हृद्रोग,कॅन्सर यासारखे व्याधी खूप मोठ्या प्रमाणात समाजात आढळत आहेत. त्यांना प्रतिकार करण्यासाठी,आपल्यातील व्याधीक्षमत्व वाढवण्यासाठी गोआधारीत शेती,विषमुक्त सेंद्रीय आहार,देशी गाईचे पंचगव्य यांना बाजारपेठ मिळवून देणे व त्यांचा प्रचार व प्रसार करणे हे आपल्या समाजाच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, हे ओळखून रोटरी क्लब ऑफ तळेगांव दाभाडे ( Talegaon Dabhade ) यांनी निवडक प्रामाणिक ऊत्पादकाना विनामूल्य स्टॉल्स उपलब्ध करून या सर्व लघुउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी हा शेतकरी,गोपालक,लघुउद्योजक यांचा मेळावा ‘रोटरी फेस्ट’ नावाने करण्याचे ठरवले आहे.

तरी सर्वांनी अधिकाधिक संख्येने प्रतिसाद देवून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प प्रमुख वैद्य ज्योती मुंदरगी यांनी केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.