Pimpri: पिंपरीत भाजीपाल्याचे दुकान फोडले

अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून काऊंटरमधून एक मोबाइल फोन, एक हजार 600 रुपयांचे रोख रक्कम आणि महत्वाची कागदपत्रे असा ऐवज चोरून नेला.

एमपीसी न्यूज – भाजीपाल्याच्या दुकानाचे शटर उचकटून दुकानातून मोबाइल फोन, रोख रक्कम आणि कागदपत्रे चोरून नेल्याची घटना गुरुवारी (दि. 6) सकाळी अजमेरा हाऊसिंग कॉम्प्लेक्स येथे उघडकीस आली.

राहुल रामप्रताप अगरवाल (वय 23, रा. अजमेर हाऊसिंग कॉम्प्लेक्स, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजल्यापासून 6 ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत फिर्यादी यांचे अजमेरा हाऊसिंग कॉम्प्लेक्स येथील भाजीपाल्याचे दुकान कुलूप लाऊन बंद होते.

अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून काऊंटरमधून एक मोबाइल फोन, एक हजार 600 रुपयांचे रोख रक्कम आणि महत्वाची कागदपत्रे असा ऐवज चोरून नेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.