Alandi : चालक आणि क्लीनरकडून महिलेवर रात्रभर टेम्पोत लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज – महिलेला तिच्या गंतव्य स्थळी सोडण्याच्या बहाण्याने टेम्पोत बसवून गंतव्य स्थळी न जाता इतर ठिकाणी जाऊन टेम्पोत चालक आणि क्लीनरने बलात्कार केला. मंगळवारी (दि. 10) रात्री अकरा ते बुधवारी (दि. 11) पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान आळंदी ते पिंपरी-चिंचवड परिसरात हा प्रकार घडला आहे.’

_MPC_DIR_MPU_II
याप्रकरणी 29 वर्षीय पीडित महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी टेम्पो चालक आणि क्लीनर विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री अकरा वाजता आरोपींनी पीडित महिलेला पेरणे फाटा येथे घेऊन जाण्याच्या बहाण्याने तिला आयशर टेम्पोत बसवले. त्यानंतर पेरणे फाटा येथे न नेता आरोपींनी टेम्पो पिंपरी-चिंचवडच्या दिशेने वळवला. रात्री अकरा ते पहाटे चार वाजेपर्यंत टेम्पो चालक आणि क्लीनर या दोघांनी मिळून महिलेला शिवीगाळ, मारहाण आणि दमदाटी करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

लैंगिक अत्याचार केल्यानंतर आरोपींनी पीडित महिलेला पिंपरी-चिंचवड परिसरात सोडून दिले. महिलेने पुन्हा आळंदी पोलीस ठाण्यात धाव घेऊन याबाबत गुन्हा नोंदवला आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.