Maval : धावत्या लोकल मधून पडून महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज – धावत्या लोकल मधून पडून एका वृध्द महिलेचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 1) सकाळी साडेनऊ वाजता मावळ (Maval) कामशेत मळवली रेल्वे स्थानका दरम्यान घडली.

Pimpri : पावसाळापूर्व कामे, नालेसफाई लवकर पूर्ण करावी

गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजता पुणे लोणावळा रेल्वे मार्गावर कामशेत ते मळवली रेल्वे स्थानकादरम्यान वाडीवळे गेट जवळ एक महिला लोकल मधून पडली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

मयत महिलेची ओळख पटली नाही. महिलेचे वय अंदाजे 60 वर्ष आहे. रेल्वे पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.