Woman Suicide : सहा वर्षाच्या मुलासह महिलेची विहिरीत उडी, दोघांचाही मृत्यू

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील जिरेगाव येथील एका महिलेने आपल्या सहा वर्षाच्या मुलासह विहिरीत उडी मारून आत्महत्या (Woman Suicide)  केली. उज्वला संतोष सूर्यवंशी (वय ३०) असे महिलेचे नाव आहे. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. 

 

 

याबाबत बापूराव शंकर सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी धनाजी नारायण गाढवे, गणेश नारायण गाढवे,  अभिषेक हरिदास गाढवे,  हरिदास बाबुराव गाढवे,  दत्तात्रय अशोक जांबले (सर्व रा. जिरेगाव ता.दौंड) यांच्या विरोधात पोलिसात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

MPC News Event : दृक्श्राव्य व प्रकट मुलाखतींच्या माध्यमातून शनिवारी उलगडणार ऐतिहासिक चित्रपटांच्या जन्मकथा

 

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादीची मुले संतोष व संदीप सूर्यवंशी तसेच संतोष याची पत्नी उज्वला सूर्यवंशी यांनावरील पाच जणांनी शिवीगाळ करीत काठीने मारहाण (Woman Suicide) केल्याची घटना घडली. त्याचेच शल्य मनात ठेवून उज्वला हिने आपल्या मुलासोबत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबत अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.