Crime News : चर्चमधील पाश्चरकडून महिलेची पावणेसात लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज  – चर्चमध्ये पाश्चर असल्याचे सांगत एकाने महिलेची तब्बल पावणेसात लाखांची फसवणूक केली आहे. हा प्रकार मार्च 2020 ते मे 2022 या कालावधीत चक्रपाणी वसाहत, भोसरी येथे घडला.

संदेश सॅमसन काळे (वय 25, रा. लिंभोरे वस्ती, दापोडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.याप्रकरणी महिलेने शुक्रवारी (दि.12) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला दापोडी येथील चर्चमध्ये प्रार्थनेसाठी नेहमी जात असत.आरोपी देखील त्या चर्चमध्ये धर्माचे शिक्षण देण्याचे पाश्चर म्हणून काम करत होता. दरम्यान आरोपीने त्याला पैशांची खूप गरज असल्याचे फिर्यादी यांना सांगितले.तुमचे घर गहाण ठेवा आणि मला पैसे द्या. त्या पैशांचे व्याज मी भरतो.संदेश हा चर्चमध्ये पाश्चर असल्याने फिर्यादी यांचा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता.संदेशने गहाणखत म्हणून मुखत्यारपत्र बनवले आणि त्यावर फिर्यादी यांच्या सह्या घेतल्या. फिर्यादी या अशिक्षित असल्याने त्यांना याबाबत काहीही समजले नाही.आरोपीने फिर्यादी, त्यांचा मुलगा आणि ओळखीच्या व्यक्तींकडून दोन वर्षाच्या कालवाढीत सहा लाख ७२ हजार रुपये घेऊन त्या पैशांचा अपहार करत फसवणूक केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.