Pune Crime News : लॉटरी लागल्याचे सांगून महिलेची तेवीस लाखांनी फसवणूक

एमपीसीन्यूज : ‘ काेन बनेगा कराेडपती’मध्ये तुम्हाला 25 लाख रुपयांची लाॅटरी लागल्याचे सांगून अज्ञात इसमाने महिलेस एका 23 लाख 41 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर 39 वर्षीय महिलेने पाेलीस ठाणे गाठत दाेन अनाेळखी व्यक्तीं विराेधात तक्रार दाखल केल्यानंतर, पोलिसांनी अज्ञातांवर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पुणे शहरातील सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द परिसरात संबंधित महिला रहावयास असून त्या घरी असताना त्यांना ऑगस्ट महिन्यात मोबाईलवर एका अनाेळखी व्यक्तीचा फाेन आला. त्याने आपण जिओ कंपनीतून बाेलत असून तुम्हाला ‘काैन बनेगा कराेडपती’ उपक्रमात तुमच्या जिअओ नंबरला 25 लाख रुपयांची लाॅटरी लागल्याचे सांगितले.

सदर पैसे मिळण्याकरिता टॅक्स, इन्शुरन्स याकरिता काही रक्कम भरावी लागले असे सांगितले. व्हाॅटसअपद्वारे प्रमाणपत्र, लाॅटरी तिकिट इत्यादीची माहिती पाठवून त्यानुसार वेळाेवेळी संबंधित महिला व तिचे पतीने कर आणि विम्यासाठी थाेडे पैसे पाठवले आणि बॅंकेची माहिती दिली. त्याआधारे अज्ञातांनी त्यांच्याकडून 23 लाख 41 हजार रुपयांचा भरणा करुन घेत त्यांची फसवणूक केली.

वेळेत पैसे भरले नाही तर लाॅटरीची रक्कम मिळणार नाही असे सांगत वेगवेगळी कारणे सांगून आणखी पैसे भरा अशी मागणी करु लागले हाेते. परंतु आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच सदर दांम्पत्याने पाेलीसांकडे तक्रार देत अज्ञाताने मागील तीन महिन्याचे कालावधीत वेळाेवेळी लाॅटरीचे अमिषाने पैसे उकळून फसवणुक करण्यात आल्याची फिर्याद दिली. .

याबाबत पुढील तपास सिंहगड राेड पाेलीस ठाण्याचे पाेलीस निरीक्षक (गुन्हे) प्रमाेद वाघमारे करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.