Chakan News : किराणा समान आणण्यासाठी गेलेल्या महिलेचा दुकानातील कामगाराने केला विनयभंग

एमपीसी न्यूज – किराणा सामान आणण्यासाठी किराणा दुकानात गेलेल्या महिलेचा दुकानातील कामगाराने विनयभंग केला. ही घटना 4 मार्च रोजी दुपारी चाकण येथे घडली असून याबाबात 11 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आशिष गुप्ता (पूर्ण नाव माहिती नाही. रा. समतानगर, मेदनकरवाडी, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला मैदा आणि अंगाचा साबण आणण्यासाठी घराजवळील किराणा दुकानात गेल्या. त्यावेळी दुकानात काम करणा-या आरोपी आशिष गुप्ता याने महिलेला मैदा आणि अंगाचा साबण दिला. किराणा सामानाचे 95 रुपये दिल्यानंतर आशिष याने महिलेचा हात धरून तिच्याशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.