Crime News : ज्वेलरी दुकानातून कामगाराने चोरले 17.03 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने

एमपीसी न्यूज – ज्वेलरी दुकानातून कामगाराने 17.03 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना सांगवी येथे 13 सप्टेंबरला घडली आहे.

याबाबत कैलास यादव वारे (वय 47, मॅनेजर, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात 14 सप्टेंबर रोजी  फिर्याद दिली आहे.मंजुनाथ बिराजदार, (सध्या रा. पिंपळे गुरव) या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही चोरी 13 सप्टेंबर रोजी दुपारी 12.15 वा ते 2.30 च्या दरम्यान नवी सांगवी येथील सोनिगरा गोल्ड एल.एल.पी (एस. जे. पी. एल. सोनीग्रा ज्वेलर्स) त्यांच्या ज्वेलरी दुकानात घडली आहे.

फिर्यादी यांचे कामगार आरोपी याने सेल्समन म्हणून काम करीत असताना फिर्यादी व दुकानातील काम इतर कामगारांची नजर चुकवून हातचलाखी करून दुकानातील एकूण 17.03 लाख रुपये किंमतीचा  सोन्याचा मुद्देमाल चोरून नेला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.