Thergaon: डंपरच्या धडकेत डॉक्टर तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून जात असलेल्या डॉक्टर तरुणाला भरधाव वेगात जाणाऱ्या डंपरने धडक दिली. यामध्ये डॉक्टर तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 30) सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास तापकीर चौकाकडून थेरगाव हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्यावर थेरगाव (Thergaon) येथे घडली.

SSC Result : मोठी बातमी! उद्या लागणार दहावीचा निकाल

डॉ. स्नेहिल दिगंबर परदेशी (वय 26) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पवन घनश्याम मौर्य (वय 33, रा. पुनावळे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरज शंकर ढवाण (वय 45, रा. थेरगाव Thergaon ) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा चुलत भाऊ डॉ. स्नेहिल परदेशी हा त्याच्या दुचाकीवरून तापकीर चौकाकडून थेरगाव हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्यावरून जात होता. त्यावेळी भरधाव घेण्यात आलेल्या डंपरने स्नेहिल यांच्या दुचाकीला धडक दिली.

यामध्ये गंभीर जखमी झालेल्या स्नेहिलचा मृत्यू झाला. पोलिसांनी डंपर चालकाला अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.