Pune News : झाडांना पाणी देणाऱ्या टँकरला धडकून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज : रस्त्यावरील डीवाईडर मधील झाडांना पाणी सोडणाऱ्या टँकरला पाठीमागून धडकून एका दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झालाय. शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास खराडी येथील गंगा अल्ट सोसायटी समोर हा अपघात घडला. जगदीश गोकलराम जाट (वय 19) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. चंदन नगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल नामदेव थोरात यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे महानगरपालिकेच्या पाण्याच्या टँकरने रस्त्याच्या डीवाईडर मध्ये असताना झाडांना पाणी सोडण्याचे काम करीत होते. यावेळी जगदीश जाट हा भरधाव वेगात दुचाकी चालवत असताना त्याची दुचाकी टँकरला पाठीमागून धडकली. यामध्ये जगदीश याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला. चंदन नगर पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.