Talewade Crime News: गाडी चालविताना झालेल्या वादातून सिमेंटच्या गट्टूने तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज – गाडी चालविताना झालेल्या वादाच्या कारणावरून तरुणाच्या डोक्यात सिमेंटच्या गट्टू मारला. त्यात तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी (दि.26) सायंकाळी सातच्या सुमारास रुपीनगर तळवडे येथे घडली.

प्रल्हाद धोंडीबा रायते (वय 30, रा. रुपीनगर, तळवडे) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आनंत मनोहर पीपळे (वय 21, रा. रुपीनगर, तळवडे) व त्याचे दोन साथीदार यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपीला अटकही केली.

फिर्यादी प्रल्हाद हा रुपीनगर येथील सलूनच्या दुकानात केस कापण्यासाठी गेला असता दुकानातून बाहेर येताना दुपारी गाडी चालवताना झालेल्या वादाच्या कारणावरून आरोपी आनंत याने फिर्यादी प्रल्हाद याला मारहाण केली. सिमेंटचा गट्टू डोक्यात मारून फिर्यादीला गंभीर जखमी केले. त्याच्या दोन साथीदारांनी शिवीगाळ केली हाताने मारहाण केली. शिवीगाळ करत दमदाटीही केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.